मंगळवार, ३ जुलै, २०१२

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री गणेशाय नमः ||

साष्टांग नमन माझे
गौरी पुत्रा विनायका
भक्ति ने स्मरता
नित्य आयुकामार्थ साधती
प्रथम नाव वक्रतुंड
दुसरे एकदंत ते
तीसरे क्रिश्नापिन्काक्ष
चौथे गजवक्र ते
पाचवे श्री लम्बोदर
सहावे विकठ नाव ते
सातवे विघ्न राजेंद्र
आठवे धुम्रवर्ण ते
नवे श्री भालचंद्र
दहावे श्री विनायक
अकरावे श्री गणपति
बारावे श्री गजानन
देव नावे अशी बारा
तीन संध्या म्हणे नर
विद्यार्थाला मिळे विद्या
धनार्थाला मिळे धन
पुत्रार्थाला मिळे पुत्र
मोक्षार्थाला मिळे गति
जपता गणपति स्तोत्र
सहा मासात हे फळ
एक वर्ष पूर्ण होता
मिळे सिद्धि न सौन्शय
नार्दाने रचलेले ज्हाले
सम्पूर्ण स्तोत्र हे
श्रीधराने मराठीत
पठव्या अनुपादिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा